भर दुपारी दोन परदेशी पाहुणे मला अंधेरी स्टेशनला दिसले. सगळ्या मुंबईत त्यांना अंधेरी स्टेशनच सापडावे …. बिचारे ATVM मशीन समोर उभे राहून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी स्मार्ट कार्ड लागते याची कल्पना नसावी. मी कुपन्स पंच करून (पंच झाली आहेत असं समजून ) परत येत होते. हे बंधू मशीनवर निरनिराळ्या पर्यायांवर 'टच' करून काही होतंय ते पाहत होते. त्यासाठी स्मार्ट कार्ड लागते याची कल्पना नसावी त्यांना ! (कारण परदेशांत vending machines असतात, त्यात पैसे टाकल्यावर तिकीट बाहेर येते).
त्यांना असे बघून मीच जास्त गोंधळून गेले होते. मदत करायला जावे तर पंचाईत, न जाणो …. मी हुशारी करून पुढे जाईन आणि काहीतरी करून माझाच बावळटपणा दिसून येईल, न जावे तरी पंचाईत … अंधेरी सारख्या भुलभुलैय्यात त्यांना तसेच सोडून देणेही योग्य वाटेना! शेवटी धीर करून विचारलेच !! स्मार्ट कार्ड ची गरज आहे, हे त्यांना माहित नव्ह्ते. पण माझ्या विचारण्यावर त्यांनी अगदीच मुलभूत प्रश्न उभा केला.
अ : ok … oh … ok
ब: where will we get this card ??
मी: … (इकडे तिकडे बघत उत्तर शोधण्याचा प्रयत्न करताना) - अंधेरी सारख्या स्टेशन वर ती नेमकी खिडकी शोधणे म्हणजे जरा कठीणच नाही का ……. माझ्याच डोळ्यांपुढे अंधेरी येईल की काय अशी भीती वाटून गेली !!!
अ आणि ब : अपेक्षेने माझ्याकडे बघत …. आणि निराशेन तिथल्या गर्दीकडे बघत ……
मी : अं …. अमं … (स्वगत …. कुणी सांगितलं या फंदात पडायला …)
अचानक सुटकेचा मार्ग सापडला. माझ्याकडे ते कार्ड होतेच. पण त्यात जमा रक्कम किती आहे ते मला नक्की माहित नव्ह्ते. शेवटी हे सगळं त्या दोघांना थोडक्यात सांगून मी कार्डची रक्कम बघायला मशिनच्या जवळ गेले. तेवढ्यात लक्षात आलं की आसपास थोडी 'जन्ता ' मनोरंजनाच्या उद्देशाने जमा होऊ लागली आहे. (क्या हुआ म्याडम्जी ? असं काही तरी ऐकू आलं )
मी अगदी मोठेपणाचा आव आणत, 'जन्ते ' वर थोडा इंग्लिशचा रुबाब मारत मशीनजवळ पोहोचले. ऐटीत कार्ड ठेवलं. ……हरे राम, पहिलं मशीन चालू होतं पण 'काम देत नव्हतं'?????? (म्याडम्जी दुसरा देक्खो …. . )
बाजूच्या मशिनवर तिकीट काढता येत होतं, पण योग्य त्या tab वर click होण्यासाठी फार प्रयत्न करावे लागत होते. (म्हणजे ते सुरळीत चालू होतं, या प्रकारात फार काही विशेष नादुरुस्त नाही … नेहेमीचंच आहे)………… या प्रकारात माझा रुबाब थोडा कमी झाला होता आणि कपाळावर थोड्या आठ्या वाढल्या होत्या इतकंच … फार काही नाही …माझा नंबर तिस-या मशिन वर लागला. तिथे एकाने आधी " म्याडम्जी जल्दी जाना है !! टीरेण छूट जायेगा" असं म्हणून त्याच्या कार्ड वर माझ्याकडून फर्ष्ट किल्लास चं तिकीट काढून घेतलं. माझं कार्ड त्या दोन पाहुण्यांना एका वेळची सेकंड क्लास ची दोन तिकिटं मिळतील इतकी रक्कम दाखवत होतं. मग त्यांना क्लास कोणता हवाय ते विचारलं. नशिबाने त्यांना सगळ्यात स्वस्त असेल तो क्लास हवा होता …. हे छोटं संभाषण होत असताना 'टीरेण सुटण्याची' चिंता असणारा मात्र आता आरामात उभा राहून मी आणि त्या दोन व्यक्ती नक्की काय करत आहोत ते लक्ष देऊन पाहत हॊता. आमच्यासाठी बहुदा त्याने हा अमूल्य त्याग केला असावा!
माझी थोडी धांदल उडालेली आणि आता मशिन मात्र तिकीट देण्याचं सोडून रुसण्याच्या मार्गाला लागलेलं … इतका वेळ तर नीट चालत होतं … आत्ताच काय झालं ? माझा त्रागा … फर्ष्ट किल्लास तत्परतेनं पुढे आलेला …. म्याडम्जी… पहिले ईशतेष्ण तो दबाव ,,, हा ,,… होता है … कोई नही … चलो …. त्याने माझाच किल्लास मला दाखवून दिला . मी हळूच मागे बघून ते परदेशी मला हसत नाहीत नं ते बघून घेतलं. ते बिचारे गर्दी आणि चिकचिकाटाने इतके त्रासलेले होते … ते काय मला हसणार … शेवटी एकदाचे ते तिकीट मिळाले. एखादे सन्मानपत्र मिळाले आहे अशा थाटात मी ते तिकीट त्यांना नेऊन दिले.
मग ते उतरतील त्या स्टेशन वर (चर्चगेट ) हे कार्ड विकत घेऊन परतीचे तिकीट कसे काढायचे ते त्यांना समजावून दिले. एव्हाना फर्ष्ट किल्लास गायब झाला होता. त्या दोघांनी लगेच मला पैसे काढून दिले नि माझे आभार मानू लागले.
सगळा कार्यक्रम संपवून मी माझ्या ट्रेन पकडायच्या मोहिमेवर निघाले. आपणच फक्त कशी त्यांना मदत करायची तयारी दाखवली, नुसती दाखवली असे नाही तर प्रत्यक्ष मदत केली… बाकीचे लोक मजा पाहत होते, आपणच कसे सुसंस्कृत आहोत, अतिथी देवो भव असे नुसते म्हणून चालत नाही , तसे वागावेही लागते, मी खरी धीट की त्यांच्याशी बोलण्याचा आणि मदतीचा स्मार्टपणा दाखवून …. इ.इ.इ. पिसांवर तरंगत ब्रिज ओलांडून मी आले, माझ्याकडे मघाशी काही लोक कौतुकाने पाहत होते असेही मला वाटू लागले, या पिसांवर मी वर वर जात होते …. आणि अचानक ……
अनौन्समेन्ट न होता ट्रेन आलेली दिसली …. पिसांवरून मी एकदम धप्पकन् खाली आले. सुसंस्कृतची मी एकदम असुसंस्कृत बनले आणि पुढच्यांना लोटत आणि मागच्यांना ढकलत ट्रेन मध्ये चढू लागले.

३ टिप्पण्या:
:P
फर्ष्ट किल्लास
फर्ष्ट किल्लास
टिप्पणी पोस्ट करा