काही दिवसांपूर्वी 'खुपते तिथे गुप्ते' मध्ये संगीतकार सलील कुलकर्णी यांचं एक वाक्य तंतोतंत पटलं, की प्रत्येकाचा एक लोलक असतो आणि त्यातून तो जगाकडे बघत असतो.जबाबदारी पेलताना आणि व्यावहारिक होताना तो लोलक हरवला आहे का हे प्रत्येकाने तपासून पाहायला हवे.
माझे आजोबा नेहमी म्हणायचे, काळा चश्मा लावाल तर काळंच दिसेल. प्रत्येकाने आपापला चश्मा तपासून पाहायला हवा. अनेकजण असे भेटतात की जणू सगळं जग आपापली कामं सोडून त्यांच्यावर अन्याय करायला आणि त्यांचं वाईट व्हावं म्हणून टपून बसलं आहे, पण असं खरंच आहे का? जसं भांडखोर मनुष्य सतत भांडतो व दुस-याला सांगतो की त्याने भांडण उकरून काढलं आहे. पण स्वतःचा चश्मा नीट तपासून घेतला की समोरची वेडीवाकडी दृश्य सरळ आणि स्वच्छ दिसू लागतात.
मी हा धडा ऑफिसमध्ये शिकले. माझी एक सहकारी तिच्या परीक्षेचा निकाल घेऊन हाफ डे येणार होती. पण तिला पोहोचायला उशीर झाला आणि ती फोनही उचलत नव्हती. ऑफिसमध्ये आम्ही सहज विषय निघाला म्हणून बोलत होतो- "अजून आली नाही का बरे ई. ई.". आमचा एक लोलक हरवलेला सहकारी म्हणाला, नापास झाली असेल म्हणून घरी पळाली असेल.एका क्षणासाठी सगळं कसं उदास वाटलं आणि भोवताल सगळा black and white वाटायला लागला.
पुढच्याच क्षणी एक रंगीबेरंगी लोलकातून बघणारी सहकारी म्हणाली, "नाही रे, उलट मस्त मार्क्स मिळवून पास झाली असेल आणि पार्टी करत असेल. म्हणून उशीर झाला आहे...."
हा धडा मी त्यादिवशी शिकले. त्याबद्दल त्या सहकारी मैत्रिणीची खूप आभारी आहे. माझा हरवत असणारा लोलक तिने मला परत मिळवून दिला.
हा धडा मी त्यादिवशी शिकले. त्याबद्दल त्या सहकारी मैत्रिणीची खूप आभारी आहे. माझा हरवत असणारा लोलक तिने मला परत मिळवून दिला.
२ टिप्पण्या:
Mastach dhada ahe ha :-)
khoop shiknyasarakha anibhav..aatach baghitala ki maza lolak harvlay ka?
टिप्पणी पोस्ट करा