२०१३/०३/०७

सुटी ... कशाला?

http://en.wikipedia.org/wiki/International_Women%27s_Day 
International Women's Day (IWD), originally called International Working Women's Day, is marked on March 8 every year.[1] In different regions the focus of the celebrations ranges from general celebration of respect, appreciation and love towards women to a celebration for women's economic, political and social achievements. Started as a Socialist political event, the holiday blended in the culture of many countries, primarily Eastern Europe, Russia, and the former Soviet bloc. In some regions, the day lost its political flavor, and became simply an occasion for men to express their love for women in a way somewhat similar to a mixture of Mother's Day and Valentine's Day. In other regions, however, the original political and human rights theme designated by the United Nations runs strong, and political and social awareness of the struggles of women worldwide are brought out and examined in a hopeful manner.

आज महिला दिनाचा उत्साह अनेक बायका - मुलींमध्ये दिसून आला. काहींच्या ऑफिसेस मध्ये हा दिवस साजरा करणार आहेत. काही मुली आपापल्या ग्रुप्समध्ये पार्टी करणार आहेत. इमेल्स्, मेसेजेस फॉरवर्ड होत आहेत ( proud to  be  woman !!!) वगैरे वगैरे .   वर्तमानपत्र, मासिकं, फेसबुक, ट्वीटर सगळीकडे आज काही न काही प्रसिद्ध होईल. कदाचित आंतरराष्ट्रीय स्तरावर आज मोठे कार्यक्रम होतील, भाषणे होतील. कर्तृत्ववान स्त्रियांच्या, धाडसी स्त्रियांच्या कहाण्या सांगितल्या जातील. इ.इ.
 पण ह्या सगळ्या उत्साहात अशी काही वाक्य ऐकू आली किंवा येत आहेत, ज्यामुळे एक खिन्नतेची किनार त्या उत्साहाला  प्राप्त झाली आहे. अनेक बायका सकाळी लोकल मध्ये सहज म्हणाल्या,  की:…  आज विमेन्स डे असूनही स्वयंपाकाला सुट्टी नाही". किंवा मुली म्हणत होत्या की विमेन्स डे म्हणून आज भावाकडे , बॉय-फ्रेंड कडे भेट मागून घेतली, निदान आज नाही म्हणणार नाहीत … ". आज सायंकाळी आपल्याकडे त्या अनेक बायकांना हॉटेल मध्ये जेवायला नेतील, सकाळची स्वयंपाकाची भरपाई संध्याकाळी करण्यासाठी … आपला विमेन्स डे वर म्हटल्याप्रमाणे स्वयंपाकाला सुट्टी इतक्यापुरताच  मर्यादीत झाला आहे. निदान सध्यातरी. आणि अशा अनेक स्त्रिया असतील ज्यांना हे कदाचित माहीतही नाही की आज असा काही दिवस आहे.
 भले आज बायकांना सुट्टी मिळेलही, पण बाकीच्या गोष्टी ? एकूणच माणूस म्हणून आपण कोणाला किती महत्व देतो? त्याग फक्त स्त्री करते असं नाही, अनेक वेळा पुरुषही करतो. परिस्थितीमुळे हतबल फक्त स्त्री नसते, तर अनेक  वेळा पुरुषही असतो. अन्यायाचा  बळी अनेक वेळा पुरुषही असतो.  पण मग मेन्स डे का नाही ?  विमेन्स डे जर वर म्हटल्याप्रमाणे स्त्रीच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक उन्नती साठी  असेल तर मग पुरुष निदान ह्या बाबतीत तिच्यापेक्षा  वरचढ नक्कीच आहे. म्हणून  मेन्स डे नाही कदाचित. प्रश्न सोपे असतात पण उत्तरं कठीण असतात.
ह्या सगळ्यात 'डोक्यात जाणारी' एक गोष्ट प्रकर्षाने मांडावीशी वाटते आहे. आज आपल्यापैकी कितीजण शपथेवर सांगू शकतील की भांडणात आया - बहिणींचा उल्लेख करत नाही? मला इंग्लिश मध्ये असणा-या 'sonofbitch ' या शिवीची आठवण होते. असे  वाटते…. . जो son आहे तो त्यातून निसटून जाऊन 'bitch' हा शब्द पुन्हा पुन्हा रुततो. ती शिवी त्या माणसाला न देता त्याच्या आईलाच दिली जाते.  लेकी बोले सुने लागे तसा हा प्रकार वाटतो. किती भांडणात त्या पुरुषाला  दुखावण्यासाठी व नमवण्यासाठी सुरुवातच मुळात अशा शिव्यांनी होते. अशा बोलण्यात बायकाही मागे नाहीत याची मला जाणीव आहे. किती तरी वेळा आपल्या मुलीलाच अशा शिव्या देताना ऐकलं आहे.  पण ज्या पदधतीने, ज्या शब्दांचा वापर होतो, तेच सगळं आपल्या निर्मितीसाठी कारणीभूत आहे याची जाणीव न होण्याइथपत मनं संवेदनाहीन आहेत. ( आपण शिवलिंगाची पूजा करतो  तरीही ही  परिस्थिती…).  यावरही निर्लज्ज प्रतिक्रिया देणारे लोक कमी नाहीत, " तुला … असं म्हटलं म्हणजे तू लगेच …  झालीस का?" असं विचारायला कमी करत नाहीत. त्यावर प्रश्न पडतो, की मग असं  असेल, तर प्रत्युत्तर म्हणून आपण पण शिव्याच द्यायच्या की काय?
 पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आहे की जबरदस्ती सहन  करायची आणि मग नंतर  असं काही काही म्हणवून घ्यायचं आणि वाईट वाटून घ्यायचं नाही.
बाकी सगळ्या गोष्टी, अन्याय -/ दुःख निवारण ह्या  काही एका दिवसात होणा-या नाहीत, पण निदान वर लिहिलेली ही एक गोष्ट तरी आपल्या हातात आहे नं? किमान ती  तरी आपण आठवणीने करायची  टाळली  तर किमान काही संवेदनाशील मनं दुखावण्यापासून वाचतील. स्वयंपाकाला एक दिवस सुट्टी नाही मिळाली तरी चालेल पण हे होणं जास्त गरजेचं नाही का? मग ती सुटी शिव्यांनाच देणं जास्त योग्य नाही का?
एक पाउल पुढे टाकलं तर ध्येय गाठण्याचा,  निदान त्या मार्गावर चालण्याचा विचार तरी करता येईल. अन्यथा स्वयंपाकाला एक दिवस सुट्टी हे आहेच.






२ टिप्पण्या:

Shriraj म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
Devashri म्हणाले...

धन्यवाद श्रीराज!