The life is a Swing ... of joy and Sorrow...
Never forget....when a Day ends...comes the Morrow...
A Journey must end,even if you don't win...
because its the End, which paves a way to begin...
हे सगळं तत्वज्ञान वाचलेलं आहे, माहितीचं आहे, अनेकांकडून ऐकलेलं आहे आणि वेळेला कधी समोरच्याला ऐकवून त्याचा भार हलका करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे.
तरीही ती वेळ एकदाची आली, की तगमग होतेच. अनेकदा त्या शेवटाची सूचनाही अगोदर मिळालेली असते. अगदीच अनपेक्षितपणे येत नाही ती वेळ. मनाची तयारी करायला वेळ असतो.
पण परीक्षेच्या आधी जसा अभ्यास कधीही पूर्ण होत नाही, तशीच मनाची तयारीही कधी होत नाही. आशेचा अंधुक पण चिवट धागा विलक्षण असतो हेच खरे. असेल नसेल तेव्हढी सगळी शक्ती एकवटून मी त्या धाग्याला लोंबकळत राहते. अगदी तुटेपर्यंत ताणते. मग तो तुटतो. आणि मन हिंदकळतं … सगळं तत्वज्ञान रागाने बाजूला सारून आपल्याला हवं तेच व्हायला पाहिजे असा वेडा हट्ट करत राहतं, तो हट्ट पूर्ण झाला नाही म्हणून त्रागा करायला लागतं . निराशेच्या दिशेने त्याचे झोके वाढू लागतात.
मी त्याचे झोके आशेच्या दिशेने उंच न्यायचा प्रयत्न करते, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी त्याच्या पेक्षा वरचढ आवाजात सांगायला लागते. ते ऐकत नाही.
माझ्या अचानक लक्षात येतं की वेळ खूपच थोडा आहे, आणि अनेक गोष्टी त्यात आपल्याला आवरायच्या आहेत. हा वेळ निघून गेला, तर तो पुन्हा मिळणार नाही.
मग मी निष्ठुर होते, आणि काही वेळा उगीच हट्ट करणा-या मुलाकडे जसं थोडावेळ दुर्लक्ष करून घरातली सगळी कामाला लागतात, तसं कामाला लागते. ते म्हणत राहतं, की भास होतायत. मी ऐकत नाही. आणि पूर्णपणे कामात बुडून जाते, भराभर गोष्टी आटपत जाते. एकामागून एक फडशा पाडत राहते.
मग परत येते तो…… मन नव्याने, …. नव्या आशेच्या धाग्याला धरून वर वर जात असतं आणि मला खूण करून बोलावत असतं.

२ टिप्पण्या:
Ata mla kalla tuzya evdhya file kasha check hotat ;)
tula suddha ha praytna karaycha aahe ka parat ekda? :)
टिप्पणी पोस्ट करा