काल रोजच्या प्रमाणे गाडीतून उतरून पूल ओलांडून मी फूट ओव्हर वरून चालले होते. तिकडे बाजूच्या एका इमारतीच्या गच्चीवर विशीच्या आसपासचा एक मुलगा आणि त्याचा कुत्रा खेळण्यात मग्न होते. इतके … की त्या फूट ओव्हर वरून जाणारे किती तरी लोक त्यांच्याकडे बघत होते, त्याकडे त्यांचे लक्षही नव्ह्ते. मी सुद्धा माझा वेग कमी करून त्यांच्याकडे पाहत पाहत कडेने चालत होते… थोडी रेंगाळतच … रोज मी तो फूट ओव्हरच पसंत करते जाण्याकरता … कारण तेच, खाली रस्त्यावर असणारी वाहनांची गर्दी , धूर आणि आवाज टाळायचा असतो. वरून जाताना आवाज टळत तर नाही पण तीव्रता कमी होते … धूर आणि अंगावर येणा-या वाहनांपासून सुटका होते. शिवाय मोकळा वारा येतो. पण असे सुंदर दृश्य मात्र कधी पाहायला मिळाले नव्हते. ते दोघे… एकमेकांपासून अगदी भिन्न …. वृत्ती , प्रवृत्ती , रंग रूप सगळ्याच दृष्टीने अगदी भिन्न …पण त्या क्षणी एकमेकांत इतके रममाण झालेले की त्यांना जगाचे भानही नव्ह्ते. जणू त्या दोघांना एमेकांशिवाय कोणी नव्ह्तेच. आपापल्यातच ते अगदी पूर्ण असलेले … स्वत्व विसरून दुस-यासाठी असणारे. त्या मुलाच्या चेहे-यावर अतिशय आनंद आणि तो अधोरेखित करणारे निखळ हसु…… आणि त्या कुत्र्याचा आनंद देहबोलीतून व्यक्त होत होता …. उड्या मारताना , मागे पुढे , उलट-सुलट पळताना तो नुसता उसळत होता. दोन मित्र आपल्या मैत्रीतच रमले होते …. मैत्रीचं प्रदर्शन करण्याकरता? नव्हे …. ते अगदी सहज असे रमले होते. कदाचित आपापली दुःख थोड्या कालापुरती समोरच्याला विसरायला लावत होते.
आणि मला हे दाखवणारा तो फूट ओव्हर……ह्या कारणामुळे तो मला अधिकच आवडू लागला.
मग आपले विचारचक्र नेहेमीसारखे सुरूच असते ……. कधी कधी आयुष्यात अशा फूट ओव्हर ची खूप गरज असते, रोजच्या व्यवधानांची गर्दी आणि गडबड गोंधळाच्या प्रदूषणापासून सुटका करायला. त्याच त्याच वैचारिक आणि मानसिक गोंधळातून आपण भुलभुलैय्या असल्यासारखे फिरत असतो. असं का, तसं का, असं का झालं, तसं झालं असतं तर बरं झालं असतं ……. हे सगळं मागे टाकून , दूर सोडून मोकळा वारा पिण्यासाठी गरज असते एका फूट ओव्हरची. आणि तेव्हा आपले मित्र- मैत्रिणी धावून येतात. आपल्यासाठी फूट ओव्हर होतात.
असेच काही फूट ओव्हर मला नशिबाने मिळाले. कितीतरी दिवस आमची तोंडओळख होती. पण आम्ही बोलायचो मात्र नाही…. अगदी हाय हॆलो पुरतं सुद्धा नाही . एकाच ऑफिसमध्ये… पण खूप लांब असल्यासारखे . पण कळत नकळत एकमेकांच्या सवयी आणि वागण्याचे निरीक्षण करत असू बहुदा. अंदाज घेत असल्यासारखे आणि एके दिवशी अचानक आम्ही प्रदुषणापासून सुटका करून घेतली. जेव्हा मी फूट ओव्हर वरून त्या मुलाचं आणि कुत्र्याचं दृश्य पाहिलं त्यावेळी मला पहिली आठवण माझ्या मनातल्या फूट ओव्हरची झाली. आम्ही अगदी गंभीर बोलतो, चर्चा करतो असं काही नाही. ब-याच वेळा आम्ही इतके बालिश वाद घालतो की आपलं वय , आपण जबाबदारी चं काही काम करत आहोत याचा अगदी आम्हाला विसर पडला असावा. पण ते बोलणं त्या गर्दी आणि प्रदुषणापासून खूप लांब नेतं …
त्या फूट ओव्हरमुळे खूप उर्जा मिळते. धुरामुळे धूसर दिसणारी वाट स्वच्छ दिसायला लागते. अचानक काही आनंदाचे क्षण समोर येतात. पण एक मात्र आहे, फूट ओव्हर ओलांडून रस्त्याला लागलो , तरीही त्या फूूट ओव्हरला विसरायचे मात्र नसतं आणि कधी आपणच त्याचा फूट ओव्हर व्हायचा प्रयत्न मात्र नक्की करायचा.

२ टिप्पण्या:
Mi vichar kartoy hi flyover kon ahe yacha??? :-)
Hm.... any guesses ?? :)
पण कोण आहे ते महत्वाचे नाही.. वेळेवर मिळणे महत्वाचे....:-)
टिप्पणी पोस्ट करा