'लोलक' वर आलेल्या, लिखित किंवा काही जणांनी मला सांगितलेल्या बहुतांश प्रतिक्रिया ह्या सकारात्मकच होत्या, पण तरीही काही व्यक्ती मुळातच तिरकस असतात हे पुन्हा सिद्ध झाले. त्यांना कोणतीही गोष्ट सरळ दिसतच नाही. त्यांना नेहेमी अर्धा रिकामा पेलाच दिसतो. महत्-प्रयासांनी जर अर्धा भरलेला पेला त्यांना आपण दाखवला तर त्या पाण्यात काही तरी मिसळून आपल्याला मारण्याचा कट केला नसेल कशावरून असे प्रश्न त्यांना पडतात आणि याला ते व्यवहार आणि 'practical' असणं असं नाव देतात. स्वतः सुखाने जगू शकत नाहीत आणि लोकांना समाधानाने आणि शांततेने जगू देत नाहीत.
देवाने किती सुंदर जग निर्माण केले आहे!!! अनेक गोष्टी आपल्या आनंदासाठी त्याने मुक्त हस्ताने उधळल्या आहेत. पण करणार काय? सुंदर फुले आणि रोपे पहिली की काहींना त्या रोपांवर डास येतात याचीच फक्त आठवण होते. ती फुले निर्माल्य झाल्यावर कुठे टाकणार याचीच त्याना चिंता असते. आधी ती फुले टवटवीत आहेत तोवर त्यांच्या रंग-गंधाचा तर आनंद घ्या… चांगल्या भावनेने ती देवाला अर्पण करा. …. निर्माल्याचे मागाहून पाहू . पण नाही.
याला व्यवहार म्हणत नाहीत. याला निव्वळ करंटेपण म्हणतात. अशी माणसं कधीच समाधानी राहू शकत नाहीत कारण मुळात समाधान कशातून मिळवायचे हेच त्यांना माहित नसते.
पण अशा माणसांची आज अत्यंत आवश्यकता आहे, कारण आयुष्य कसे जगू नये याचे उत्तम धडे आपल्याला त्यामुळे मिळतात आणि आपण आपल्याला नक्की कसे जगायचे आहे ते उत्तम प्रकारे उमजते.
आपली ओंजळ समाधानाने भरायची की कटकटींनी हे ज्याचे त्याने ठरवायचे.
ओंजळ करायला दोन धड हात आणि तळवे आहेत ही काय कमी गोष्ट आहे?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा