विरंगुळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विरंगुळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१३/११/१६

तिकीट

भर दुपारी दोन परदेशी पाहुणे मला अंधेरी स्टेशनला दिसले. सगळ्या मुंबईत त्यांना अंधेरी स्टेशनच सापडावे …. बिचारे ATVM मशीन समोर उभे राहून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी स्मार्ट कार्ड लागते याची कल्पना नसावी. मी कुपन्स पंच करून (पंच झाली आहेत असं समजून ) परत येत होते. हे बंधू मशीनवर निरनिराळ्या पर्यायांवर 'टच' करून काही होतंय ते पाहत होते.  त्यासाठी स्मार्ट कार्ड लागते याची कल्पना नसावी त्यांना ! (कारण परदेशांत vending machines असतात, त्यात पैसे टाकल्यावर तिकीट बाहेर येते). 
त्यांना असे बघून मीच जास्त गोंधळून गेले होते. मदत करायला जावे तर पंचाईत, न जाणो …. मी हुशारी करून पुढे जाईन आणि काहीतरी करून माझाच बावळटपणा दिसून येईल, न जावे तरी पंचाईत … अंधेरी सारख्या भुलभुलैय्यात त्यांना तसेच सोडून देणेही योग्य  वाटेना! शेवटी धीर करून विचारलेच !! स्मार्ट कार्ड ची गरज आहे, हे त्यांना माहित नव्ह्ते. पण माझ्या विचारण्यावर त्यांनी अगदीच  मुलभूत प्रश्न उभा केला. 

अ :   ok … oh … ok 
ब: where will we get this card ??
मी:   … (इकडे तिकडे बघत उत्तर शोधण्याचा प्रयत्न करताना) - अंधेरी सारख्या स्टेशन वर ती नेमकी खिडकी शोधणे म्हणजे जरा कठीणच नाही का ……. माझ्याच  डोळ्यांपुढे अंधेरी येईल की  काय अशी भीती वाटून गेली !!!

अ आणि ब :  अपेक्षेने माझ्याकडे बघत …. आणि निराशेन तिथल्या गर्दीकडे बघत …… 
मी :  अं …. अमं …  (स्वगत …. कुणी सांगितलं या फंदात पडायला  …)

अचानक सुटकेचा मार्ग सापडला.  माझ्याकडे ते कार्ड होतेच. पण त्यात जमा रक्कम किती आहे ते मला नक्की माहित  नव्ह्ते. शेवटी हे सगळं त्या दोघांना थोडक्यात सांगून मी कार्डची रक्कम बघायला मशिनच्या जवळ गेले. तेवढ्यात लक्षात आलं की आसपास थोडी  'जन्ता ' मनोरंजनाच्या उद्देशाने जमा होऊ लागली आहे. (क्या हुआ म्याडम्जी ? असं काही तरी ऐकू आलं )
मी अगदी मोठेपणाचा आव आणत, 'जन्ते ' वर थोडा इंग्लिशचा रुबाब मारत मशीनजवळ पोहोचले. ऐटीत कार्ड ठेवलं. ……हरे राम, पहिलं मशीन चालू होतं पण 'काम देत नव्हतं'?????? (म्याडम्जी  दुसरा देक्खो ….  . )
बाजूच्या मशिनवर तिकीट काढता येत होतं, पण योग्य त्या tab वर click होण्यासाठी फार प्रयत्न करावे लागत होते. (म्हणजे ते सुरळीत चालू होतं, या प्रकारात फार काही विशेष नादुरुस्त नाही … नेहेमीचंच आहे)………… या प्रकारात माझा रुबाब थोडा कमी झाला होता आणि कपाळावर थोड्या आठ्या वाढल्या होत्या इतकंच … फार काही नाही …माझा नंबर तिस-या मशिन वर लागला. तिथे एकाने आधी " म्याडम्जी जल्दी जाना है !! टीरेण  छूट जायेगा" असं  म्हणून त्याच्या कार्ड वर माझ्याकडून  फर्ष्ट  किल्लास चं तिकीट काढून घेतलं. माझं कार्ड त्या दोन पाहुण्यांना एका वेळची सेकंड क्लास ची दोन तिकिटं मिळतील इतकी रक्कम दाखवत होतं. मग त्यांना क्लास कोणता हवाय ते विचारलं. नशिबाने त्यांना सगळ्यात स्वस्त असेल तो क्लास हवा होता …. हे छोटं संभाषण होत असताना 'टीरेण सुटण्याची' चिंता असणारा मात्र आता आरामात उभा राहून मी आणि त्या दोन व्यक्ती नक्की काय करत आहोत ते लक्ष देऊन पाहत हॊता. आमच्यासाठी बहुदा त्याने हा अमूल्य त्याग केला असावा!
माझी थोडी धांदल उडालेली आणि आता मशिन मात्र तिकीट देण्याचं सोडून रुसण्याच्या   मार्गाला लागलेलं … इतका वेळ तर नीट चालत होतं … आत्ताच काय  झालं ? माझा त्रागा … फर्ष्ट  किल्लास तत्परतेनं पुढे आलेला ….  म्याडम्जी… पहिले ईशतेष्ण तो दबाव ,,, हा ,,… होता है … कोई नही … चलो …. त्याने माझाच किल्लास मला दाखवून दिला . मी हळूच मागे बघून ते परदेशी मला हसत नाहीत नं  ते बघून घेतलं. ते बिचारे गर्दी आणि चिकचिकाटाने इतके त्रासलेले होते … ते काय मला हसणार … शेवटी एकदाचे ते तिकीट मिळाले. एखादे सन्मानपत्र मिळाले आहे अशा थाटात मी ते तिकीट त्यांना नेऊन दिले.
मग ते उतरतील त्या स्टेशन वर (चर्चगेट ) हे कार्ड विकत घेऊन परतीचे तिकीट कसे काढायचे ते त्यांना समजावून दिले.  एव्हाना फर्ष्ट  किल्लास गायब झाला होता. त्या दोघांनी लगेच मला पैसे काढून दिले नि माझे आभार मानू  लागले. 
सगळा कार्यक्रम संपवून मी माझ्या ट्रेन पकडायच्या मोहिमेवर निघाले. आपणच फक्त कशी त्यांना मदत करायची तयारी दाखवली, नुसती  दाखवली असे नाही तर प्रत्यक्ष मदत केली… बाकीचे लोक मजा  पाहत होते, आपणच कसे सुसंस्कृत  आहोत, अतिथी देवो भव असे नुसते म्हणून चालत नाही , तसे वागावेही लागते, मी खरी  धीट की  त्यांच्याशी बोलण्याचा आणि मदतीचा स्मार्टपणा दाखवून …. इ.इ.इ. पिसांवर तरंगत ब्रिज ओलांडून मी आले, माझ्याकडे मघाशी काही लोक कौतुकाने पाहत होते असेही मला वाटू लागले, या पिसांवर मी वर वर जात होते …. आणि अचानक …… 
अनौन्समेन्ट न होता ट्रेन आलेली दिसली …. पिसांवरून मी एकदम धप्पकन् खाली आले. सुसंस्कृतची मी एकदम असुसंस्कृत बनले आणि पुढच्यांना लोटत आणि मागच्यांना ढकलत ट्रेन मध्ये चढू लागले. 

२०१३/०६/२३

Die neue Lehre

Noch eine gute Idee....   ich mag Origamy. Was man mit Origami lernt, ist dann wie man eine Verwandtschaft behält.

Man muss das Papier sorgfältig benutzen.

Zuerst muss man darauf achten, was das Endprodukte werden soll. Darum muss man die Reihenfolge von allen Falten in Rücksicht nehmen.


Dann fängt man an, um die Reihe der Falten zu folgen.
Aufmerksamkeit  ----   eine falsche oder eine fehlerhafte Falte kann alles durcheinander und dann wird das Endprodukte nicht erfolgen.


Gleich ist bei der Verwandtschaft. Eine falsche oder 'nicht so richtige' Anmerkung kann eine entsprechende Auswirkung auf die Beziehung haben.




Darum bitte befassen Sie alle Beziehungen und Personen sorgfältig!!!! 

२०१३/०५/०९

Swing

The life is a Swing  ...  of joy and Sorrow...
Never forget....when a Day ends...comes the Morrow...
A Journey must end,even if you don't win...
because its the End, which paves a way to begin...

हे  सगळं तत्वज्ञान वाचलेलं आहे, माहितीचं आहे, अनेकांकडून ऐकलेलं आहे आणि वेळेला कधी समोरच्याला ऐकवून त्याचा भार हलका करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे.

तरीही ती वेळ एकदाची आली, की तगमग होतेच. अनेकदा त्या शेवटाची सूचनाही अगोदर मिळालेली असते. अगदीच अनपेक्षितपणे येत नाही ती वेळ. मनाची तयारी करायला वेळ असतो.
पण परीक्षेच्या आधी जसा अभ्यास कधीही पूर्ण होत नाही, तशीच मनाची तयारीही कधी होत नाही. आशेचा अंधुक पण चिवट धागा विलक्षण असतो हेच खरे. असेल नसेल तेव्हढी सगळी शक्ती एकवटून मी त्या धाग्याला लोंबकळत राहते. अगदी तुटेपर्यंत ताणते. मग तो तुटतो. आणि मन हिंदकळतं … सगळं तत्वज्ञान रागाने बाजूला सारून आपल्याला हवं तेच व्हायला पाहिजे असा वेडा हट्ट करत राहतं, तो हट्ट पूर्ण झाला नाही म्हणून त्रागा करायला लागतं .  निराशेच्या दिशेने त्याचे झोके वाढू लागतात.
मी त्याचे झोके आशेच्या दिशेने उंच न्यायचा प्रयत्न करते, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी त्याच्या पेक्षा वरचढ आवाजात सांगायला लागते. ते ऐकत नाही.
माझ्या अचानक लक्षात येतं की वेळ खूपच थोडा आहे, आणि अनेक गोष्टी त्यात आपल्याला आवरायच्या आहेत. हा वेळ निघून गेला, तर तो पुन्हा मिळणार नाही.
मग मी निष्ठुर होते, आणि काही वेळा उगीच हट्ट करणा-या मुलाकडे जसं थोडावेळ दुर्लक्ष करून घरातली सगळी कामाला लागतात, तसं  कामाला लागते.  ते म्हणत राहतं, की भास होतायत. मी ऐकत नाही. आणि पूर्णपणे कामात बुडून जाते, भराभर गोष्टी आटपत जाते. एकामागून एक फडशा पाडत राहते.
मग परत येते तो…… मन नव्याने, …. नव्या आशेच्या धाग्याला धरून वर वर जात असतं आणि मला खूण  करून बोलावत असतं.

२०१३/०३/१०

उपास

आज महाशिवरात्र . माझ्यासारखे उपासाची अँलर्जी असणारे लोकही हा उपास सहसा टाळत नसतील. कोपिष्ट महादेवाच्या भितीने असेल कदाचित.....पण कुठलाही देव का असेना.... आपण मन मानेल ते करायचं.... कोपिष्ट महादेव असला म्हणून काय झाले? जिथे 'तिसरा डोळा' नावाची डिटेक्टिव्ह मालिका निघाली अशा ठिकाणी आपल्या तिस-या डोळ्याचा काय पाड, या चिंतेने बसला असेल बिचारा. पण आज अगदी दिवसभर अभिषेकांना तोंड देत सगळ्यांना आशिर्वाद मात्र नक्की देईल.
तर मुख्य प्रश्न आहे उपासाचा. एकादशी दुप्पट खाशी हे कोणीतरी आधीच म्हणून आणि त्यातच आपल्या उपासचं बिंग फोडून ठेवलं आहे. आणि असं ही आपण बुवा खिचडीसाठी उपास करतो हे सांगून अनेकजण  बिचारे त्या विधानाला पुष्टी देण्यासाठीच तर धडपडत आहेत. हो... वाडवडिलांनी सांगितलेलं जर खोटं ठरलं तर मग काय प्रतिष्ठा राहिली.... नाही काय? माझं तर फारच ढोबळ धोरण आहे या बाबतीत.. "उपास करणार का?" असं विचारलं की तिरकी मान हलवायची..शक्यतो तोंडी उत्तर देणे मी टाळतेच. समोरच्याने आपल्या सोयीप्रमाणे अर्थ लावावा. त्यामुळे उपासाच्या बाजूने आणि उपासाच्या विरोधी अशा दोन्ही बाजूने बसणारी बोलणी टळून दोन्ही पद्धतीच्या पदार्थांवर ताव मारता येतो.  हे भांड नंतर फुटतं आणि "मग विचारलं तेंव्हा म्हणाली की उपास करणार ....मग म्हणाली की नाही.. नुसती मान हलवायची..बोलायचं नाही " इ. इ. बाण अंगावर येतात, पण पोट भरलेलं असल्याने फार ईजा न होताच आधीच मी वामकुक्षीची सीमा ओलांडून गाढ झोपेच्या मार्गाला लागलेली असते.
आणि या उपासाची एक गमतीदार आठवण ......एकदा ऑफिसमधील आम्ही सात आठजण पिकनिकला गेलो होतो: अर्थातच अर्धा शुक्रवार वीकेंडमध्ये धरून..एकीचा शुक्रवारचा उपास होता आणि एकीचा शनिवारचा. कर्मधर्मसंयोगाने आम्हाला उशीर होऊन शुक्रवारी रात्रीच्या जेवणासाठी रेस्टराॅं सापडायला अकरा-साडेअकरा वाजले. शनिवारचा उपासवाली म्हणाली "उद्या काही नाॅनव्हेज खाता येणार नाही.त्यामुळे मी आता खाते." झाले.....शुक्रवारच्या उपासवालीचे असंही दिवसभरच्या उपासाने आणि आम्ही तिच्या नाकावर टिचून केलेल्या चरंतीमुळे पित्त खवळले होते. नाॅनव्हेजचे नाव काढताच तिचे अवसान गळाले. पण करणार काय? असं पाहिलं तर दिवस संपायचा होता. उपास मोडला असता. त्या दोघींचा घोळ एकीकडे चालू होता तोवर आम्ही ऑर्डर दिली. शनिवारवाली मजेत आस्वाद घेऊ लागली. शुक्रवारचीला काही उपासाचा घास गोड लागेना. तिची चलबिचल होत होती. गप्पा आणि हसण्या-खिदळण्यात वेळ गेला. एकाएकी शनिवारवाली झटक्यासरशी उठली. १२.०० वाजायला अगदी अर्धा-एक मिनिट बाकी होता. घाईने जेवण कसंबसं संपवलेलं तिने. जीवाच्या आकांताने धावली तोंड धुवायला. आल्यावर म्हणते"..मग मी नजर ठेवून होते घड्याळावर. आता  शनिवार सुरु झाला नं. मग त्याच्या आत नॉनव्हेजचे तोंड धुवायचे होते....:-) " शुक्रवार संपला हे कानावर पडताच ...दुसरीला अशी टवटवी आली ...जणु अनेक वर्षांचा उपास घडला होता. इतका वेळ बिचारी हिरमुसल्या चेहे-याने बसली होती. देवीलाच दया आली आणि शुक्रवार संपला एकदाचा. तिने मागवलेल्या डिशेस् वर यथेच्छ ताव मारला. आणि आता शनिवारवाली ....इतका वेळ शनिवार सुरू व्हायची वाट बघत होती, ती आता पुन्हा घड्याळाकडे वळली....शनिवार संपायची वाट बघत. एक वेळचा उपास, धान्यफराळ, निर्जळी उपास, अळणी उपास असे प्रकार तर पाहिले होते. पण असा काट्यावरचा उपास ....तो त्यावेळी बघायला मिळाला.

२०१३/०२/०४

लपंडाव

लबाड मन माझ्याशीच लपाछपी खेळतं ...
घाईगर्दीत चालताना , अचानक लक्षात येतं , मन रुसून बसलेलं असतं...
माझ्या गतीपेक्षा  मागे पडलेलं असतं,
मी घाईने पुढे जाते म्हणून रुसलेलं असतं.
बोथट झालेले त्रासदायक कंगोरे आठवून , उगाळून उगीचच त्यांना धार लावत असतं...
कितीही समजावलं तरी ते ऐकत नाही
आपला हट्ट  ते कधी सोडत नाही.....  तरी मी समजूत काढत राहते.
"अरे जरा इतरांची दुःख बघ ..आपण दोघं किती बरं सुखी"
माझं प्रवचन पूर्ण होतं , न होतं,
मन इकडे तिकडे बघतं आणि परत हळूच त्या कंगो-यांकडे वळतं.
शहाणपणा शिकवण-या माझ्याकडे रुसून बघत राहतं.
मनाला सारखं ताळ्यावर आणत रहावं लागतं.
हे कर , ते कर असं  त्याला  सारखं गुंतवावं लागतं.
सारखं असं आंजारून गोंजारून मी कंटाळून जाते...
खरंच का माझं मन बिचारं दुःखी ?
असं म्हणत त्या चकव्यात गुरफटत जाते.


मग लबाड मन माझ्याकडे बघतं हळूच हसतं ... मिश्कीलपणे..
पोक्तपणाचा आव आणून 'कन्फूशिअस' होतं.
मी मघाशी बांधलेलं शहाणपणाचं गाठोडं उलगडायला लागतं.
माझ्या सुखाच्या राशी माझ्या डोळ्यांपुढे उभ्या करतं.
स्वप्नांच्या रंगीबेरंगी इंद्रधनूवर अलगद तरंगू लागतं ...  ठेंगू जादुगारासारखं ,
क्षुल्लक गोष्टींवर खदखदून हसतं ...  आणि मलाही हसायला लावतं.

खरंच किती मी वेडी...
कशी फसते त्या फसव्या मनाच्या फसव्याला...


वेड्याची मी परत शहाणी होते आणि
शहाण्या  मनाला  माझं बोट धरायला देऊन पुढे चालू लागते.
चार पावलं गेल्यावर पाहते तर काय ....

बोट सोडून लबाड मन रस्त्यातच फतकल् मारून बसलेलं असतं
तेच फसवे कंगोरे शोधून पुन्हा
माझ्याशी लपंडाव खेळण्यात रमलेलं असतं.....



२०१३/०१/०९

पार्ट्या

        

            आज मी घरी पनीर टिक्का बनवला. तो 'मी' बनवला असल्याने जरा जास्त कौतुक ... माझं मीच केलेलं. साहित्य, कृती, सजावट (garnishing), ह्या सगळ्याच्या मध्ये फोटो सेशन, थोडी चव घेऊन बघितली, काही कमी जास्त घालायचं आहे का ही चर्चा केली (मी ..माझ्याशीच) आणि एकदाचा  तो पनीर टिक्का झाला... चांगला झाला ... मग  मी त्याची चव घेतली आणि आठवणीत मागे पडलेले दिवस अन् चेहरे असं बरंच काही सापडलं. अर्थात ते काहीच विस्मरणात गेलेलं नव्हतं, पण घाई-गर्दीच्या दैनंदिनीत थोडं मागे पडलं होतं.       

                                           आमच्या जुन्या घरी असताना घरात आम्ही एकंदर ९ जण होतो. आजी आजोबा, काका-काकू आणि चुलत भाऊ , आई-बाबा आणि मी आणि ताई. आमच्या बिल्डींगमध्ये मजल्यावर ४ ब्लॉक होते. आमच्या मजल्यावर एकूण चार घरं मिळून २१ माणसं - ९ मुलं-मुली आणि १२ मोठी. ब्लॉक सिस्टीम असली, तरी मोठ्यांची नुसती वयंच मोठी नव्हती तर मनंही मोठी आणि मोकळी होती त्यामुळे दिवसभर चारही दारं उघडी असायची, चाव्या एकमेकांकडे असायच्या. आम्ही मुलं आपापल्या घरी कमी आणि शेजारीच जास्त असायचो. ते दिवस जिव्हाळ्याने नटलेले होते. टीव्ही वरचे सुपरहिट मुकाबला, छायागीत, चांगले चित्रपट एकत्रच बघितले जायचे, थिएटर मध्ये एकत्र जाणं व्हायचं. पण ह्या सगळ्यात  प्रकर्षाने आठवतात त्या आमच्या 'पार्ट्या'. 

              दुपारी एकमेकांकडे निरोप , वाती , पुस्तक यांची देवाणघेवाण करायचं निमित्त व्हायचं आणि कोणीतरी म्हणायचं "काकू खूप दिवसांत पार्टी नाही झाली'... म्हणायचा अवकाश, कोणतीही काकू असो, लगेच "चल मग आज करूया की .." असं ती म्हणायचीच. लगेच मेन्यु ठरायचा, तयारी सुरु व्हायची. चारही घरांतून सामानसुमानाची जमवाजमव व्हायची  आणि ऑफिस मधील मंडळी  घरी परतायच्या आत पार्टीची  सगळी तयारी झालेली असायची. एकांकडे स्वयंपाक, दुस-यांकडची सतरंज्या आणि भांडी, तिस-यांकडे जेवणं आणि आमच्याकडे गप्पांची बैठक हा जणू नियमच होता. मजेमजेत, आरडा-ओरडीत स्वयंपाक पार पडायचा, मजल्यावरील काका लोकांची स्पेशल भज्यांची डिश् असायची. गप्पा आणि हसण्या-खिदळण्यातच सगळी  पार्टी पार पडायची.

                 कधी भारत बंद , कधी मुंबई बंद असेल, पावसामुळे गाड्या बंद असतील,तर हमखास सगळीच जणं घरी असायचीच, मग तर पार्टी ठरलेलीच. बटाटेवडे व्हायचेच पण एकत्र असण्यामुळे  ते अधिक चटकदार लागायचे.

                   ह्या पार्ट्याना निमित्त नव्हती, ऑर्गनायाझर्स नव्हते. डेकोरेशन्स नव्हती. त्या पार्ट्या अगदी सरळ 'पार्ट्या' च होत्या , ते इव्हेंट्स नव्हते, त्या ट्रीट्स नव्हत्या. ते एक संमेलन असायचं. त्यात झगमग नव्हती, चकचकाट नव्हता; पण मजा  होती, एकत्रितपणाचा आनंद होता, प्रेम होतं. महागडे पिझ्झाज्, किवा ग्रेव्हीज् नसायच्या पण एक नव्हे तर तीन काकूंच्या हाताची प्रेमाची चव होती. (खालच्या मजल्यावरील लोकांच्या थोड्या हेव्याची चटकदार फोडणीही होती; कारण त्या मजल्यावरील चार घरं अशा पद्धतीने कधी एकत्र यायची नाहीत.) मनं तृप्तच असायची, त्यात हिशेबी वखवख नव्हती. कोणाकडच्यांचं  काय अन् किती हे कधीच मोजलं नाही.

               आता आम्ही नव्या जागेत आलो. आजहि मी कितीतरी वेळा 'पार्टीज्' ना जाते. त्यामध्ये गम्मत नाही असं मुळीच नाही. त्याचीही एक वेगळी मजा आहे. त्या चकचकाटातही सफाईने वावरता यायला हवं , पण जुन्या आठवणी ह्या कायमच सोबतीला असतात. सफाईने टूथपिक् ने  टोचून स्टार्टरस् खाताना मजेने फन्ना उडवलेली भजी आठवतात, अशा वातावरणात आपल्या पार्टीतल्या माणसांची कशी तारांबळ उडाली असती किंवा त्यांनी 'ह्याच्यात  काही मजा  नाही, आपल्या पार्टीतच खरी मजा आहे असं नक्की म्हटलं असतं' असे तरंग मनात उमटतच राहतात. असो.

              हे दिवस मला अनुभवायला मिळाले हे काय कमी आहे? आता ते दिवस काही परत येणार नाहीत, पण त्यांच्या आठवणी तर कोणी हिरावून घेणार नाही. आणि काय सांगावं... आम्ही अजूनही कधी सगळे भेटतो..  एखादी अशी पार्टी अचानक होऊनही जाईल .. पूर्वीही ती अचानकच व्हायची.. अगदी तशीच....

२०१२/०८/०१

वाटतं,

मऊ मऊ माती व्हावं 
कुंभाराच्या हाती घडावं  
वेलीवरचं फुल व्हावं
देवाच्या पायी निर्माल्य व्हावं
एक लहानशी लेखणी व्हावं
शब्द्सामार्थ्यातून  स्त्रवावं
चालना देणारी स्फूर्ती व्हावं
कृतार्थ करणा-या कलेचं रूप घ्यावं
वाहणारा गार वारा व्हावं
थकलेल्या पांथिकाला झुळुकीने सुखवावं
मेघ होऊन गर्जना करत यावं
बरसून सृष्टीला नवजीवन द्यावं
धारांतून जन्मून प्रवाही व्हावं
तृषार्ताला तृप्त  करावं

तेजोमय भास्कराचा एक अंश व्हावं
तिमिरातून प्रकाशाकडे न्यावं
निळं अथांग आकाश होऊन
मुक्त विहारी खगांना स्वैर उडू द्यावं
चोहीकडे रंगांची उधळण करत यावं
ते लेणं वसुंधरेने ल्यावं

पण महात्मा होऊ नये
कारण माझं लहानसं दुःख मला विसरता येत नाही
आणि मला शस्त्र व्हायचं नाही
कारण विसरता येऊ नये असं दुःख मला 
कुणालाच द्यायचं नाही.


आमच्या मैत्रिणीसाठी खास केलेली कविता  



TÜV  मध्ये येऊन check केलं documentation 

कि सगळंच confusion !

planning वर मिळालं  कधी rejection

कधी miss out केलं Calculation


, होतं असं कधी कधी

पण किती वेळा केलं आम्ही celebration !

,  TÜV मध्ये enjoy सुद्धा केलं

, असंही कधी झालं

 म्हणून मित्रांना दिली मदतीची पावती     C

,  , म्हणून दाखवली सह-अनुभूती

बोलणं कमी आणि हावभाव, खाणाखुणा जास्त  B

BPO team बरोबर कधी बागडायला मिळालं मस्त

 , आठवणी असतील या  खासच !
खूप झालं TÜV , आता मात्र z बासच!  I