'तुम्ही मोठ्या न!'
लोकसत्ताच्या चतुरंग मधील लेख 'तुम्ही मोठ्या न!' खूपच आवडला.
ही अगदी आपल्या भोवताली घडणारी गोष्ट आहे. अगदी सहज बायका म्हणून जातात, "तुम्ही जरा सांगा! तुम्हाला माहित असेल!"
माझ्या आणि माझ्या मैत्रिणीच्या घरी अगदी असेच झाले. आमच्या शेजारच्या काकू अगदी हौशी आहेत आणि कोणाकडेही मदतीला, समारंभाला आवर्जून हजर राहतात. आपल्याकडच्या समारंभांत म्हणजेच बारशाला, डोहाळजेवणाला, मुहूर्ताचे पापड घालायचे असतील, मंगळागौरीला सगळीकडे त्या हौसेने जातात आणि असणा-या पद्धती, म्हटली जाणारी गाणी त्यांना माहित असतात. त्यांना माहीत नाही असे कधी नसतेच पण जर काही नाही आठवले तर त्या मनमोकळेपणाने कबूल करतात. उगीच "मी म्हणते न! मग? " असा आव आणत नाहीत. जर गाणी नाही आठवली तर सहज म्हणतात "ए तुम्ही मुली आपली सिनेमातली म्हणा गं गाणी, काही हरकत नाही"
नाहीतर अशा वेळी काही बायका लगेच टीका करायला पुढे सरसावतात - आजकालच्या मुलींना काही माहीत नसतं, त्यांना जुन्या पद्धतींची लाज वाटते ... हे आणि ते ..." पण आम्हाला तरी सांगितल्याशिवाय कशी माहिती होणार या सगळ्या गोष्टींची? नव्या मुलींना लाज वाटते हे काही खरे नाही. पण मुलींना नको ह्या सबबीखाली आयाच हे सगळं टाळत असतात कि काय असं वाटतं! कदाचित त्यांनाच हे सगळं माहीत नसेल किंवा नको असेल....!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा